म्हणी

म्हणी ह्या मराठी भाषेला समृद्ध करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतात. त्यामध्ये हजार शब्दांचा सारांश एका ओळीत देण्याची ताकद आहे. परंतु ख्रिस्ती बायबल आधारीत मराठी म्हणी आपण क्वचितच वाचल्या किंवा ऐकल्या असतील. खाली दिलेल्या म्हणी सुनिल रणनवरे ह्यांच्या रचना आहेत.
१. कितीही आवळा, शेवटी नोहाचा कावळा
२. हाती बायबल अन् मती दियाबल
३. स्वतः कडू दवणा, अन् म्हणे देव मला पावणा
४. हाती एसाव पण बाती याकोब
५. मरीयेचा बाळ अन् सैतानाचा काळ
६. मान न मान मै तेरा जोनाथान
७. अरे वारे व्वा, कबुली राहेलची अन् पाठवणी लेआची
८. मुखी योहान तीन सोळा पण आचरणात गोळा
९. म्हणत राहा हुजुर, हुजुर, साहेबाला खाऊ घाल इस्त्राईलची खजुर
१०. साहेबाला दे दोन बाटल्या गालीलची वाईन मंग समद होईन एकदम फाईन
११. गेहजी सारखं धावायचं अन् पदरी कोड पावायचं
१२. कोठारं भरून कमवायचं अन् दुसर्या दिवशी गमवायचं
१३. शास्त्र माझ्या पाठ अन् येशूशी पडली गाठ
१४. लढावं यवाबा सारखं अन् पढावं पौला सारखं
१५. बसायला ओसरी अन् घासायला मिसरी
१६. साहेबाकुन घे शिकून अन् टाक जमिन विकून
१७. हाती नाय फोन अन् नाव शलमोन
१८. याजक भोळा अन् वपेवर डोळा
१९. चीमुटभर द्यायचं अन् मुठभर घ्यायचं
२०. कामवालीचं लक्ष बाईसाहेबाच्या पर्सवर (दासीचं लक्ष धणीनीच्या हाताकडे)
२१. रात भर तळ्यात पन मासा नाही जाळ्यात
२२. आयुष्य वाहीलं परंतु मंदिर नाही पाहीलं
२३. माळ्याचं वाया गेलं बळ फांदीला नय आलं फळ
२४. ठेवलंय पुजायला अन् लागलंय कुजायला (एखादी वस्तु उपयोगात न आणता नुसतीच बाळगुण ठेवणे)
२५. सदाचरणाला सुट्टी नसते आणि धर्माचरणाला रजा नसते
२६. फुलांच्या) हारांमध्ये कमवायचं आणि गजर्यांमध्ये गमवायचं
२७. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणायचे आणि द्या टाळी म्हणायचे (स्वतःच एखाद्या गोष्टीस कारणीभूत असणे)
२८. हागार साठी कुढं अन् साराचं नाव पुढं
२९. एदेनात राहून देवाशी वैर
३०. लोकांना छळायचं आणि शरणपुरांत पळायचं किंवा चूकुन झालं म्हणायचं आणि शरणपुरांत पळायचं
३१. पापाचा शीरी भार आणि पहिला धोंडा मार
३२. बायबल वाचतां येईना,म्हणे चष्मा घरी राहिला
३३. पाळकाला पाकीटाची आशा
३४. पाळकांच पोर, मंडळीवर शिरजोर
३५. नावाला बवाज आणि पाळत नाही रीवाज
३६. नावाला रूथ अन् कामाला कुथ