Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /var/www/f58facbe-e340-461d-9060-4f8055190d53/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Saturday, January 10, 2026
Uncategorized

जगातली सर्वात महागडी जागा!

भाषण, लेखन, कविता, चारोळ्या, शायरी, सुविचार हे बालपणापासूनच्या शिक्षणाने आणि वडिलोपार्जीत गुणधर्मांनी माझ्यात आलेच. वेळोवेळी मला सुचेल तसे मी तयार करून ठेवत असे. परंतु त्यांचे जतन आणि प्रकाशन मात्र क्वचितच करत असे. माझ्यातील ह्या गुणांचा वडिलांनी आणि वडिलधार्‍यांनी नेहमीच आदर केला. वडील बंधू, मित्र मंडळी ह्यांच्याकडून नेहमी प्रोत्साहन मिळत राहिले. ते मला सुचवत असत की ह्या रचनांचे जतन करून ठेव, नंतर प्रकाशनाचा विचार कर. मात्र मी मनमौजी. त्यांचे बोलणे सहजतेने घेत असे.

एकदा माझे मोठे बंधू म्हणाले की ह्या जगातली सर्वात महागडी जागा कोणती? मी जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांची नावे सांगत बसलो. व्यावसायिकतेच्या दृष्टिकोणातून कुठल्या जागा महागड्या असतील त्याचा विचार करून उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु मोठ्या बंधुंवर त्याचा आजिबात परिणाम होत नव्हता. मी अजून कसोशिने प्रयत्न करून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो, पण व्यर्थ. शेवटी त्यांनाच दया आली असावी, ते म्हणाले जगातील सर्वात महागडी जागा म्हणजे कबरस्तान. कारण परमेश्वराने दिलेल्या विविध गुणधर्मांनी, कलागुणांनी नटलेले, सवरलेले अनेक लोक त्यांच्यातील अमुल्य प्रतिभेला आपल्या अवतीभोवतीच्या जगापर्यंत न पोचवताच तिथे पोहोंचतात. आणि तो अती मोलवान साठा स्वत:सोबतच जमिनिच्या हवाली करतात. तो साठा कायमचा त्यांच्यासोबतच लोप पावतो. तो कोणाच्याही कामी येत नाही. त्यांच्यासोबत पुरल्या गेलेल्या त्या मोलवान साठ्यामुळे कबरस्तान हे सर्वात महागडी जागा आहे.

आपल्या पेक्षा वडील असणार्‍या लोकांना आपला स्वभाव उमगतो आणि त्यांच्या अनुभवाने भरपूर त्यांचे बोल आपल्याला आजिबात निराश न करता आवश्यक तो बोध आणि प्रोत्साहन देऊन जातात. मी लिहावे, कविता, शायरी, चारोळ्या, सुविचार रचावे व ते संचयीत करून प्रकाशन करावे हा मोठ्या बंधूंचा सल्ला मला वरील प्रश्न व त्याच्या स्पष्टीकरणाने अगदी स्पष्ट झाला.

आता सोबत लहानशी डायरी आणि पेन बाळगतो. लेखनही करतो आणि जतनही करतो.

देवाची स्तुती करतो की परमेश्वर विविध माध्यमाने प्रकाशनाची संधी देत आहे. टंकलेखन, संगणक, इंटरनेट, वेबसाईट, ब्लॉग ह्या सर्वांबाबतही प्रशिक्षण प्राप्त होत आहे व ह्या सर्वांकरिता उत्तम साहाय्यकही लाभलेत. मनाला दिव्य समाधान आहे की माझ्याजवळचा ठेवा माझ्यासोबत कबरेत जाणार नाही तर इतरांपर्यंत पोहोचत आहे.

आपणही लिहा, रचना करा, मात्र जतन करून ठेवा आणि प्रकाशीत करा! अनेकांची जीवने आशीर्वादीत होतील.   

2 thoughts on “जगातली सर्वात महागडी जागा!

  • सर, आपण फार श्रिमंत आहात. स्वत:चा विकास तर आपण साधलाच परंतु इतरांच्या उन्नतिचाही विचार करून आपण सतत विविध साहित्य प्रकाशित करत आहात. मी आशीर्वाद पावलो.

    Reply
  • Shreya

    Sir, I had never thought in this way about the Cemetary. The place where no human wants to go could be the richest location in the world if we do not share our knowledge with others. Thank you so much for sharing your knowledge with us.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *