व्यावहारीक म्हणी

रणनवरे सर ह्यांनी केवळ बायबल आधारीत ख्रिस्ती म्हणीच नव्हे तर दैनंदीन जीवनात वापरता येतील अशा काही व्यावहारीक म्हणिंची सुद्धा रचना केलेली आहे. त्या खालील प्रमाणे:
१. आईला कधी नाही दिल लुगडं ना बापाला कधी कापड,
मित्रांना वाढतोस कुरडई आणि पापड.
२. बरं नसतांना बापाला आणायची नाही गोळी,
वाटण्या करायच्या म्हटलं की मग पुरणपोळी.