रणनवरे कोण?

रणनवरे कुटुंब मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रिरामपूर तालूक्यातील टाकळी भान ह्या गावचे. देवाने सर्वच रणनवरेंना अद्भुत दानांनी युक्त केलेले आहे म्हणून ते सर्वच देवाचे सदैव ऋणी आहेत. रामचंद्र (जॉन) शंकर रणनवरे हे पेशाने शिक्षक होते. ते अमेरिकन मिशन बॉईज हायस्कुलचे मुख्याधापक, सैनिकी प्रशिक्षणार्थी केंद्र येथे मार्गदर्शक, अहमदनगर महाविद्यालयात मानसशास्त्र विषयाचे व्याख्याते, अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष, अमेरिकन मराठी मिशन शिक्षण संस्थांचे सल्लागार होते.
वरील सेवा करीत असतांनाच अहमदनगर पहिली मंडळी (सि एन आय) चे व प्रवरानगर इंग्लिश चर्चचे प्रिस्ट इंचार्ज होते. भोर तालुक्यातील नसरापूर आध्यात्मिक जीवन केंद्र येथे त्यांनी संडेस्कुल टिचर्स ट्रेनिंग सेंटर इमारत उभारली. ह्या संस्थेचे ते स्टडी डायरेक्टर व जनरल मॅनेजर सुद्धा होते.
आर. एस. रणनवरे सरांच्या पत्निचे नाव तारा होते. ह्या दाम्पत्याला दोन मुले. थोरला मुलगा अनिल आणि धाकटा मुलगा सुनिल. ते अनुक्रमे राजू आणि संजू म्हणून परिचित.