काव्य

कविता, शायरी, चारोळ्या ह्या आपल्याला जीवनाची अनेक वास्तविकतांचे दर्शन चुटकीसरशी करून देण्यास पुरक आहेत.
सुनिल रणनवरे स्वत: एक कवी आणि शायर आहेत. त्यांच्या अनेक रचनांनी आपणास अर्थपूर्ण बोध होईल.
रुधिर स्नान
होतो गर्तेत पडलेला,
काढावे बाहेर कोणी,
धुवाव्या जखमा माझ्या,
इच्छा आर्त होती.
ज्याने ऐकली हाक,
कणव त्यालाच होती ,
धुतले जेंव्हा मला त्याने,
धार त्याच्या रुधिराची होती.
कृपा (१८ जानेवारी,१९८१)
मायेमुळे त्याच्या,
कायेला मी भुललो नाही.
कृपा मजवरील त्याची,
कधी ढळलीच नाही.
कणीक वासनेची,
मी कधी मळलीच नाही.
काय असतो “काय” तिचा,
जीज्ञा मनी भरलीच नाही.
भेटावया तिला,
वेळ कधी ठरलीच नाही.
ध्यैय आयुचे दैवी प्रभा,
विश्वास खडकांवरी,स्तंभरूपी मी उभा.
पाहिली दूरून
सळसळणारी वासना
पाऊल तिचे,
स्तंभाकडे वळलेच नाही.
काठी
पडली जरी काठी
माझ्या पाठी,
उठला जरी वळ,
गाठला वेदनेचा तळ,
तरी सोसाया दे बळ,
प्रभो तुझ्या साठी.